बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील सेवक जगदाळे यांना किरकोळ कारणावरुन महाविद्यालयाबाहेरील पवार यांच्या कर्मवीर स्टेशनरी दुकानासमोर मारहाण झाली.
शनिवारी सकाळी जगदाळे हे महाविद्यालयासाठी लागणारे किरकोळ साहित्य घेण्यासाठी या स्टेशनरी दुकानात गेले असता हा प्रकार घडला आहे. सदरचा प्रकार हा किरकोळ कारणावरुन झाला असून झालेल्या मारहाणीत खांद्याजवळून हात ढिला झाल्याने दुखापत झालेल्या जगदाळे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगदाळे यांना झालेल्या मारहाणीमुळे महाविद्यालयातील सर्व कर्मचार्यांनी मारहाणीबाबत गुन्हा दाखल करावा अन्यथा कामबंद आंदोलन करु असे लेखी निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर फरताडे यांचेकडे दिले आहे. या प्रकारानंतर काही काळ महाविद्यालयात तणावाचे वातारवरण निर्माण झाले होते.
जखमी जगदाळे यांना उपचारासाठी रुग्णालयात भूल देण्यात आल्याने हा प्रकार नेमका कशामुळे झाला त्याची माहिती उपलब्ध झाली नाही. बार्शी पोलिसांनी या प्रकाराची नोंद घेतली असून जगदाळे यांचा जबाब घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.