पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज शिवनेरी येथे केले.
किल्ले शिवनेरी येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, विनायक मेटे, युवराज संभाजीराजे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजातील शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. काही अपवाद वगळल्यास मराठा समाजातील लोक नोक-या आणि उद्योगातही उच्च पदावर कमीच ठिकाणी आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. पण आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन कसोट्यावर टिकावा, त्यावरून कोणताही वाद निर्माण होता कामा नये यासाठी आकडेवारी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये विद्यार्थी, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतच्या सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने उत्कृष्ट काम केले आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन ठोस पावले टाकली जात आहेत.
राज्यातील किल्ले संवर्धनाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. किल्ले संवर्धनाच्या कार्यक्रमातून नव्या पिढीसमोर इतिहास जिवंत ठेवण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी अधिक निधीची तरतूद करून कार्यक्रमास गती देण्यात येईल. शिवनेरी किल्ले परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. राज्यातील सर्व गडांची माहिती संकलित करून ती माहिती गडांच्या परिसरात योग्यरितीने पर्यटकांना समजेल, अशा पद्धतीने लावण्यात येईल, असेकामकेलेजाणारअसल्याचेमुख्यमंत्रीचव्हाणयांनीसांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे. हे स्मारक जगातील उत्कृष्ट असे स्मारक व्हावे यासाठी जगभरातून स्मारकासाठी संकल्पना मागविण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विनायक मेटे, युवराज संभाजीराजे यांचेही भाषण झाले. यावेळी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कवितके, तहसिलदार प्रल्हाद हिरामणी, अधीक्षक अभियंता डी.जी.मळेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महात्मा फुले सांस्कृतिक भवनाचे उदघाटन
गेल्या दहा वर्षात राज्याची आर्थिक प्रगती वेगाने झाली असून याचा उपयोग विकासासाठी झाला आहे. यामुळे नागरिकांचे जीवन सर्वदृष्टीने समृध्द होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महात्मा फुले सांस्कृतिक भवनाचे उदघाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते वानवडी येथे आज झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुण्याच्या महापौर चंचला कोंद्रे कार्यक्रमाचे अध्यक्षा होत्या. आमदार गिरीश बापट, विनायक निम्हण, शरद रणपिसे, रमेश बागवे, मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पुणे मनपा आयुक्त विकास देशमुख यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर अशी ओळख आहे. पुण्यात आयटी, उद्योग नगरी, कला नगरी अशी आगळे वेगळे वैशिष्ट्य, ओळख आज पुण्याची होत आहे. पुणे महानगर पालिका शहराच्या विविध भागात नागरिकांना सोयी सुविधेबरोबरच कला रसिकांच्या सोयीसाठी सांस्कृतिक भवन, नाट्य भवनाची निर्मिती करीत आहे. पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम होत आहे. आर्थिक प्रगतीमुळे विकास कामाकरिता निधी मिळतो. याचा उपयोग नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास, जीवन समृध्द होण्यास होतो.
श्रीमती चंचला कोद्रे यांनी यावेळी पुण्यातील सांस्कृतिक भवनाची माहिती दिली. वानवडी परिसरातील कलाप्रेमी, नागरिकांची सोय यामुळे होईल, असे त्या म्हणाल्या.