पांगरी (गणेश गोडसे) :- माहेरहुन तिन लाख रूपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना मांडेगांव (ता. बार्शी) येथे घडली.
    स्वाती संतोष जाधव (वय 26, रा.मांडेगांव, हल्ली रा. देवगांव) असे जाचहाट झालेल्या विवाहितेचे नांव असुन जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरूदध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
   पिडीत स्वाती जाधव या विवाहीतेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, पती संतोष जाधव, सासरा पांडुरंग भगवान जाधव, सासु अन्नपुर्णा पांडुरंग जाधव व केशर अंधारे या चौघांनी मिळुन त्यांना माहेरहुन तिन लाख रूपये घेऊन ये असे म्हणुन उपाशीपोटी ठेऊन शिवीगाळ दमदाटी करत शारीरीक व मानसिक छळ केला. विवाहीतने दिलेल्या फिर्यादिवरूण सासरच्या चौघांविरूदध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आसुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top