उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की, आपल्या लॉग इन आय डीवर प्रलंबित असलेले विद्यार्थ्यांचे फॉर्म सहाययक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास लॉग इन ला फॉरवर्ड करावेत व मॅन्युअली फॉर्म सर्व कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडून 25 फेब्रुवारीपूर्वी तपासून घ्यावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ई-स्कॉलरशिप ही योजना कार्यान्वित केली असून या योजनेमुळे शिष्यवृत्ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात तर शिक्षण शुल्क संबधित महाविद्यालयाच्या खात्यात जमा होते. जे मागासवर्गीय विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांनाच मॅक्ट्रीकोत्तर शिष्यवृतीचा आणि संबंधित महाविद्यालयांना शिक्षण फी व परीक्षा फीचा लाभ देण्यात येते. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, उस्मानाबद यांना महाविद्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या फॉर्मवर कालानुक्रमिक पध्दतीने निकाली काढण्यात येणार येते.
चालू वर्ष संपण्यास अल्पसा कालावधीअसल्याने कुठल्याही प्रकारचर विलंब झाल्यास व मागासवर्गीय भारत सरकार मॅक्ट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फीपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची व प्राचार्याची राहील याची नोंद घ्यावी. या संदर्भात कांही अडचणी आल्यास दुरध्वनी क्रमांक 02472-22214/ 222313 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,उस्मानाबादयांनी केले आहे.