उस्मानाबाद :- नेहरु युवा केंद्र,उस्मानाबाद यांच्यावतीने राष्ट्रीय युवक धोरण आणि राजीव गांधी खेल अभियान याविषयी जनजागृती  करण्यासाठी युवक-युवतींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहन गोस्वामी आदींची यावेळी उपस्थिती होती.
         ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे श्रीतुळजाभवानी  जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे येवून तेथे समारोप करण्यात आला.
         यावेळी सहभागी युवक, युवतींनी नागरिकांना राष्ट्रीय युवक धेारण त्यातील घटक युवकांना त्याचा लाभ कसा होणार आहे, त्याची अंमलबजावणी आदींची माहिती असणारी पत्रके वाटली. याशिवाय राजीव गांधी खेल अभियानाची माहिती  असणारी पत्रकेही नागरिकांना वाटण्यात आली.                      
 
Top