उस्मानाबाद :- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा रविवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक पोलीओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण जिल्हा समन्वय समितीची सभा आज जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) टी. के. नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी यांच्यासह समितीच्या इतर सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.
रविवारी होणा-या पल्स पोलिओ मोहिमेसाठी ग्रामीण भागात 1 हजार 66 आणि शहरी भागात 151 असे एकुण 1217 लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील 1 लाख 79 हजार 794 बालकांना पोलीओ लसीची मात्रा दिली जाणार आहे. यासाठी आवश्यक त्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. हाश्मी यांनी यावेळी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी कार्यकर्ती, पर्यवेक्षक, अंगणवाडी मदतनीस यांच्या मदतीने सुक्ष्म नियोजन करुन ही मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना यावेळी डॉ. नारनवरे यांनी दिल्या. जिल्ह्यातील शाळांच्यावतीने जनजागृतीसाठी प्रभातफेरी, प्रत्येक वॉर्ड, गाव, वस्ती, तांडा येथे पोस्टर्स ,स्टीकर्स आणि ध्वनीक्षेपकाव्दारे मोहिमेची माहिती दयावी, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी आपल्या पाच वर्षाच्या आतील मुलांना पोलीओची लस दयावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील शहरी भागात उस्मानाबाद येथे 46, तुळजापूर 23, उमरगा 19, नळदुर्ग 16, मुरुम 15, कळंब 16, भूम 8, परंडा 8 याप्रमाणे लसीकरण केंद्राची सोय करण्यात आली आहे. याशिवाय बसस्थानक, बाजार, बांधकाम, रिक्षा स्टॅन्ड आदि ठिकाणीही ट्रांन्झिट कॅम्पव्दारे विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे यांनी कळविले आहे.