उस्मानाबाद -: तेर येथील नदीपात्रात पाण्याचा साठयात वाढ होण्यासाठी  जलसंपदा विभागाने मंजूर वर्ष 2012-13 मध्ये शिरपूर पॅटर्न राबवून नदीपत्रात खोलीकरण व रुंदीकरण केल्याने उन्हाळयातही पाणीसाठा ठेवून पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण केलेल्या शिरपूर पॅटर्नच्या कामाचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मंजूर निधीतून गणेश मंदीर सभा मंडपाचेही उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. पाटील यांनी श्री संत गोरोबा काका मंदीरात जाऊन दर्शन घेतले. या तीर्थ क्षेत्रास ब दर्जा प्राप्त झाल्याबद्दल तेर येथील मंदीर संस्थान व नागरिकांच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  
तेर येथील रामलिंगप्पा लामतुरे वस्तू संग्रहालयास ग्रामविकास मंत्री पाटील यांनी भेट देऊन सातवहण काळातील पाण्यात तरंगणारी वीट, रोम कालीन जाते, कार्तीक स्वामींची मुर्ती, गरुडावरील बसलेला गणपती, हस्त दंतावर कोरलेली 6 इंच बाहुली आदि वस्तूंची पाहणी केली. रामलिंगप्पा लामतुरे यांनी संग्रहालयातील वस्तूंची यावेळी माहिती दिली.
      यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, सौ.अर्चना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जलसंपदा कार्यकारी अभियंता श्री.कोटेचा, सहायक अभिरुक्षक दिलीप मानुसमारे, शिवाजी नाईकवाडी, उपसरपंच दीपक नाईकवाडी, भारत नाईकवाडी  आदि उपस्थित होते. 
    येरमाळा ता. कळंब येथील  अनुसूचित जाती, जमाती व नवबौध्द विकास योजना सन 2013-14 अंतर्गत भिमनगर व सिध्दार्थनगर या सिमेंट रस्ते व नाली बांधकामांचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. श्री. पाटील यांनी   येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. श्रीक्षेत्र येडेश्वरी मंदीरास ब दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय, येरमाळा व  मंदीर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.
    यावेळी तेर व येरमाळा येथील पदाधिकारी-अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top