उमरगा (लक्ष्मण पवार) :- प्राचीन काळापासूनच महिलानाही पुरुषाबरोबर समाजात आदराचे स्थान होते, हे पुन्हा एकदा आजच्या आधुनिक युगात वावरताना सिध्द होत आहे. या पुरुषाबरोबर कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिलांचे कर्तृत्व दिसून येत आहे. म्हणून ग्रामीण भागातील महिला वर्गामध्ये याविषयी जागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अणदूर (ता. तुळजापूर) येथील जवाहर महाविदयालयाचे प्राचार्या डॉ. अनिता मुदकण्णा यांनी केले.
मुरुम (ता. उमरगा) येथे ब्रम्हकुमारी केंद्र व मैत्रीण ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी प्राचार्या मुदकण्णा हया बोलत होत्या. याप्रसंगी बोलताना लोहारा येथील ब्रम्हाकुमारीचे संचालिका सरीता बहनजी म्हणाल्या की, महिला किंवा पुरुष असो आपल्या जीवनात इतर कार्याबरोबरच प्रत्येकाना अध्यात्मिक अधिष्ठानाची गरज आहे आणि हे गरज जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य ब्रम्हाकुमारी ही संस्था महिलांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करत आहे.
दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येनी स्पर्धकांनी भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी ॲड.चिंचोळीकर यांनी महिलांसाठीच्या कायदयाचा योग्य वापराविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांचे प्रसाद देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी मुरुम सेवा केंद्राचे संचालक राजु भाई, उमरगा सेवा केंद्राचे शिल्पा बहन, कवठयाचे जयश्री, दाळींबचे वनिता, महादेवी, मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा मिनाक्षी जगा, डॉ. सुवर्णा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शामल जोशी यांनी तर सूत्रसंचालन कु. जयश्री भोसगे यांनी केले.