उमरगा (लक्ष्मण पवार) :- मराठवाडा संविधान परिवारांच्या बाले किल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणाच्या महामार्ग दाखविला आहे, असे मत पुणे येथील बहुजन हिताय ट्रस्टचे सचिव धम्मचारी उपायराजा यांनी व्यक्त केले.
    उमरगा येथील बहुजन हिताय विदयार्थी वस्तीगृहात गुणवंत विदयार्थ्यांचा गुण गौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हटटे, लोहारा पंचायत समितीचे सभापती असिफ मुल्ला, दिलीप भालेराव, वसतीगृहाचे अध्यक्ष धम्मचारी संघभद्र, पं.स. सदस्या सौ. रेखा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. वसतीगृहातील गुणवंत व यशस्वी विदयार्थ्यांचा स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत 26 जानेवारी रोजी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाचा ठराव मांडणारे लोहारा पं.स. सभापती असिफ मुल्ला यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
    यावेळी डॉ. व्हटटे बोलताना म्हणाले, भारतीय राज्य घटना ही इतिहासाचा वारसा आहे. जगातील सर्वोत्कृष्‍ठ राज्य घटना म्हणून त्याचा उल्लेख होतो. त्या घटनाकारांचा आदर्श डोळयासमोर ठेवून सर्वच शासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करावे, असे परिपत्रक काढणारी राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद आहे, असेही ते म्हणाले.
    कार्यक्रमास नगरसेवक सतिश सुरवसे, भारीपचे प्रदेश सचिव रामभाऊ गायकवाड, ॲड. हिराजी पांढरे, कवी गुणरत्न भालेराव, विठठल साई साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सादीक काझी, ॲड. बी.आर. कलवले, शिवलिंग माळी, दिलीप चव्हाण, विजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. धम्मचारी अनोम किर्ती व प्रा. सहदेव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी आभार मानले.
 
Top