बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राऊत चाळ येथील राज-विजय क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती मिरवणुकीत डिजीटलद्वारे महान देशभक्त, थोर स्वातंत्र्यसेनानी, शहिद व राष्ट्रपुरुषांची प्रेरणास्थाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यातील काही घटनांचे छायाचित्र यांचे प्रबोधन करण्यात आले. मोरया चित्रपटातील गाजलेल्या नादब्रह्म पुणे या ढोल पथकाने बार्शीकरांचे लक्ष वेधले.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याचे पूजन तसेच मिरवणुकीचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी राजेंद्र मिरगणे, जिल्‍हा परिषद विरोधी पक्षनेते संजय पाटील, अॅड. सुभाष जाधवर, पट्टम पवार, नगरसेवक सोमनाथ पिसे, रावसाहेब मनगिरे, जि.प. विरोधी पक्षनेते वैरागचे संतोष निंबाळकर, विजय नाना राऊत, न.पा. विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, पंचायत समिती सभापती सौ. कौसल्‍या माळी, उपसभापती केशव घोगरे, दादा गायकवाड, वैभव पाटील, अभिजित राऊत, किशोर मांजरे, नागेश राऊत, महावीर कदम, अभिजीत गाढवे, दिपक राऊत, काका फुरडे आदीजण उपस्थित होते.
    सवाद्य मिरवणुकीतनेक प्रकारच्‍या वाजंत्री तसेच घोडे व हत्‍तीवर शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेल्‍या लहान बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
Top