डॉ.राकेश नेवे
वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस परिवर्तन होत असले तरी रुग्‍णांवर औषधोपचाराबरोबर मानसिक दिलासा देऊन वैद्यकीय उपचार करुन नावलौकीक मिळविणारे पुणे येथील ऑन्‍कॉलॉजिस्‍ट डॉ. राकेश नेवे हे होय.
    मानवी जीवनात अनेक चढ-उतारामधून घडणा-या प्रसंगातून चांगले, वाईट अनुभव येतात. अनेक चांगल्‍या वाईट प्रवृत्‍ती दिसून येतात. बहुतेक माणसे स्‍वतःसाठीच जगतात, तरी थोडी फार माणसे ही इतरांसाठी जगतात व हेच लोक जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून देतात. पण हा आदर्श घालून देण्‍यासाठी त्‍यांनी जन्‍मभर साधना केलेली असते आणि त्‍यानंतरच ते सकल मानव जातीला मार्गदर्शक ठरतात. कारण त्‍यांनी जिवनातील प्रत्‍येक पाऊल हे विचारपूर्वक टाकलेले असते. आपण मात्र संपूर्ण जीवन अविचाराने जगतो. सध्‍याच्‍या या कलयुगात असे लोक फारच कमी प्रमाणात लाभतात आणि हेच लाक सकल मानव जातीचे उध्‍दारक ठरतात. यांनी आपले संपूर्ण जीवन आदर्श तत्‍वांनी जगलेले असतं. पृथ्‍वीवर जन्‍म घेतलेल्‍या मानवरुपी देहामध्‍ये माणूसपण निर्माण करण्‍याचं कार्य ते करतात. ज्‍यांनी आपले पूर्ण आयुष्‍य इतरांसाठी वेचलं, अनेकांना मृत्‍यूच्‍या दाढेतून बाहेर काढून त्‍यांना निडरपणे जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिलं, असे डॉ. राकेश नेवे यांचे करावे तितके कौतुक‍कमी आहे. डॉ. राकेश नेवे हे पुणे येथील नोबल हॉस्‍पीटल, साने गुरुजी रुग्‍णालय अशा अनेक हॉस्पिटलमध्‍ये ते कॅन्‍सरसारख्‍या आजाराचे निदान करुन त्‍यावर योग्‍य ती शस्‍त्रक्रिया करुन रुग्‍णास रोगमुक्‍त करतात व त्‍याला जगण्‍याची नवी दिशा देतात. अत्‍यंत मितभाषी व प्रेमळ असलेले डॉ. राकेश नेवे हे सर्वप्रथम रुग्‍णास विश्‍वचासात घेऊन त्‍याला या आजाराची माहिती देऊन कमीत कमी खर्चामध्‍ये रुग्‍णाला बरे करण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न करतात. ग्रामीण भागातून जाणा-या अनेक गरीब रुग्‍णांना त्‍यांनी कमीत कमी खर्चामध्‍ये दुरुस्‍त केले आहे. वेळेप्रसंगी ते रुग्‍णास केलेल्‍या शस्‍त्रक्रियेची फिस देखील माफ करतात. सकाळी नऊ वाजल्‍यापासून संध्‍याकाळी आठ वाजेपर्यंत ते वेगवेगळ्या ठिकाणी शस्‍त्रक्रिया करीत असतात. या कामासाठी डॉ. नेवे यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. नेवे या ही त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभ्‍या आहेत. पुणेसारख्‍या एका मोठ्या शहरात ग्रामीण भागातील रुग्‍णासाठी एक आपलेसे वाटणारे डॉक्‍टर डॉ. राकेश नेवे यांची ओळख आहे.
Success is not permanent,
and failure is not final. 
So never stop working 
after success and 
never stop trying after failure.
कोणतेही यश हे कायमस्‍वरुपी नसते आणि अपयश हे ही अंतिम नसते. म्‍हणून यशानंतर काम करणे थांबवू नका आणि अपयशानंतर प्रयत्‍न करणे थांबवू नका.
 
- प्रा. दिपक जगदाळे   
नळदुर्ग,
मो. 9422609525
 
Top