बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कसबा पेठेतील शिवजन्‍मोत्सव मंडळाच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
    यावेळी नगराध्यक्ष कादर तांबोळी, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, तुकाराम शिंदे, अॅड.बी.एन.चव्हाण, आबा पवार, दत्ता शिंदे, गटनेते नागेश अक्कलकोटे, विलास रेणके, मनिष चौहान, बाळासाहेब पाटील, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, नगरसेवक अंबादास शिंदे, संदीप बारंगुळे, गणेश जाधव, रमेश पाटील, पंकज शिंदे, अॅड. अविनाश गायकवाड, अजित कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  खासदार डॉ.पाटील यांनी जय भवानी जय शिवाजीचा नारा देत नृत्य करणार्‍या घोड्याची सवारी करुन भगवा ध्वज हाता घेऊन जयजयकार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांना दाद दिली.
     बाल शिवाजीच्या वेशातील लहान मुले व मावळे, दांड पट्टा पथक अस्सल मराठमोळ्या पारंपरागत वेषातील महिलांचा समावेश असलेले चिंचवड पुणे येथील आर्या ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधत होते. डिजे डॉल्बी, बॅण्ड पथक, वानेवाडी येथील नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या आनंदाश्रमातील बाल वारकरी टाळ मृदंगाच्या तालात मिरणुकीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. बेटी बचाव, जल है तो कल है असा संदेश देणारे तसेच राष्ट्रपुरुषांची प्रेरणा देणारे डिजीटल मिरवणुकीच्या अग्रभागी होते.
    औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक श्रीकांत शिंदे यांच्यासह कसबा ग्रुपचे पाडुरंग राऊत, तुकाराम ढगे, मनोज फुले, अभिजीत मुंडलीक, पंकज शिंदे, भाऊ मोरे, किशोर भोसले, अन्वर कझी, राहुल शिंदे, इब्राहिम शेख, आकाश व सागर शिंदे, तसेच दिलीपरावजी सोपल मित्र मंडळ, शहर व तालुका राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राऊत व सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दोन्ही शिवजयंती मिरवणूकीत डिजेचा मोठा आवाज पोलिसांनी व नागरिकांनी विना तक्रार सहन केला.
 
Top