पांगरी (गणेश गोडसे) : एकीकडे प्रसिध्‍दी, डामडौल, मिरास, मोठेपणा याच्यापाठीमागे लागलेल्या आजच्या काळात पांगरी परिसरातील कांही महत्वाची गांवे अपवाद ठरत आहेत. या परिसरातील महत्वाची गावे डिजीटलमुक्त ठरल्यामुळे व अनेक गावे ही डिजीटलमुक्तीच्या मार्गावर असल्यामुळे अलिकडील कांही काळात झपाटयाने पुढे आलेली एक विकृत परंपरा या गांवातील लोकांनी झिडकारल्याचेच पहावयास मिळत असुन बार्शी तालुक्यातील इतर गांवांना ही गांवे आदर्श ठरू पहात आहेत. समाजात अलिकडील कांही वर्षात स्वस्तात प्रसिदधी मिळवुन देणारी डिजीटल संस्कृतीने चांगलाच जम बसवलेला असुन अशा डिजीटल फलकांमुळे समाजात अनेकवेळा जातीय, सामाजीक तेढ निर्माण होऊन त्यातुन समाजा समाजात दंगली पेठुन वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेच्यांची हानी झाल्याच्या ताज्या घटना आहेत.मात्र स्तुती व प्रसिदधी ही सर्वानाच हवी हवीशी वाटणारी गोष्ठ असल्यामुळे सहजासहजी यापासुन कोणीच वाचु शकत नाही. मात्र औदयोगिकरणाचे वाढते फायदे यामुळे डिजीटल फलकांचे दरपत्रक ढासळल्यामुळे उठ सुठ कोणीही आपली प्रसिदधीची हौस भागवुन घेऊ लागले आहेत.
   पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील साठ गांवामध्ये पांगरी पोलिसांतर्फे नो डिजीटल ही संकल्पना गत एक महिन्यांपासुन राबवण्‍यास सुरूवात केली असुन या मोहिमेस ब-याच अंशी यशही प्राप्त होऊ लागले आहे. पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीमधील पांगरी शहरासह इतर अनेक महत्वाच्या गावातही माहिम यश्स्वी होऊन गावेच्या गावे डिजीटलमुक्त होऊ लागलेली असुन अनेक छोटी-मोठी गांवे डिजीटलमुक्त होण्‍याच्या आसपास पोहचलेली आहेत. अलीकडे आपले नेत्यावरील प्रेम, निष्ठा व जवळीक दाखवण्‍यासाठी तर काहीजण स्वतःच्या मोठेपणासाठी चार हौशे नवशांचे फोटो घेऊन आपली प्रसिध्‍दीची इच्छा पुर्ण करून घेतात. गावाच्या चौकातील महत्वाची ठिकाणे बस स्थानके, रेल्वे स्थानके, महत्वाची शासकीय, निमशासकीय कार्यालये ही डिजीटल फलकांच्या विळख्यातच सापडलेली होती. ती नो डीजीटल या मोहिमेमुळे मुक्त होऊ लागली आहे. ज्या गांवांमध्ये ही मोहिम फत्ते झालेली आहे तेथील गांवात चौक रस्ते मोकळा श्‍वास घेऊ पहात आहेत.
  पांगरी पोलिसांनी फलकांमुळे निर्माण होणारी स्फोटक परिस्थती टाळुन हदीत शांतता प्रस्थापित करण्‍याच्या उदेशाने सर्वसंमतीने एक आदर्श अशी आचारसंहीता तयार करून त्याची माहिती गावोगावी पोहचवुन जनप्रबोधन केले आहे. ग्रामपंचायत, पोलिस ठाणे यांच्या पुर्वपरवानगीशिवाय डिजीटल लावु नयेत, फलक लावण्‍याची, काढन्याची व आक्षेपार्ह मजकुरामुळे कांही घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीतांची राहणार असुन त्याच्यावर कारवाई करण्‍यात येणार आहे. बॅनर लावण्‍याच्या ठिकाणासह त्यावर फोटो असणा-यांचे भ्रमनध्वनी यांची माहिती द्यावी लागणार असुन शासकीय इमारतींवर बॅनर लावण्‍यास बंदी करण्‍यात आली आहे. पांगरी हद्दीत नो डिजीटल वॉर वेगाने गती घेत असुन पांगरी पोलिसांनी गावोगावी जावुन ग्रामपंचायतीत ग्रामसभांमधुन जनजागृती करत लोकांना डिजीटल फलकांमुळे उदभवणा-या परिस्थतीची माहिती दिल्यामुळे प्रबोधन होऊन गावोगावी डिजीटल फलक लोकांकडुन स्वतः काढले जावु लागले आहेत.
   अनेक संवेदनशिल गांवांमधुन डिजीटल फलक गायब :
पांगरी पोलिसांनी तयार केलेल्या डिजीटलफलकांच्या आचारसंहितेचा धसका घेऊन व झालेल्या जनजागृतीमुळे पांगरीसह चिखर्डे, येळंब, ममदापुर आदी पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीमधील गावांमधील सुजान नागरीकांनी स्वतः डिजीटलफलक काढुन घेऊन एक आदर्श इतर गांवांसमोर ठेवण्‍याचा मान मिळवला आहे. चिखर्डे गावात तयार करण्‍यात आलेल्या आचारसंहितेच्या फलकाचे अनावरनही करण्‍यात आले.पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील सर्वच गांवे डिजीटलमुक्त करून जातीय तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्‍न संपवुन डिजीटलमुक्तीचा पांगरी पॅर्टर्न तयार करू असा आशावाद पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.शरद मेमाणे यांनी बोलताना व्यक्त केला.
 
Top