उस्मानाबाद -: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत ग्रंथ महोत्सव-2014 चा नुकताच समारोप झाला. जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेच्या सभागृहात आयोजित समारोप समारंभप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंद आडसुळ, उपशिक्षणाधिकारी रमेश जोशी, मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबादचे सचिव बालाजी तांबे, मुकुंदराजे निंबाळकर, प्रा. डॉ. महेंद्र चंदनशिव, विस्तार अधिकारी श्री. धुरगुडे आदिंची योवळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांच्या उपजत कला, गुणांना वाव, प्रेरणा दिल्यास त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. पुस्तके संकट काळात दु:ख विसरुन जगण्याची ताकद देवून आयुष्य सुखावतात. ज्ञानाची भूक भागवविण्यासाठी वाढ दिवसानिमीत्त पुष्तकाचे भेट दयावीत, असे प्रतिपादन जेष्ठ दलित कथाकार योगीराज वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. श्री. वाघमारे पुढे म्हणाले की, शिक्षकांनी शाळेत भित्तींपत्रके, कवीसंमेलन ,कथाकथनाचे कार्यक्रम घेवून विद्यार्थ्यांमधील साहित्यीक शोधावा. पुस्तके खरेदी करण्याबरोबरच दररोज वाचन करण्याची सवय लावण्याची गरज आहे.
आडसुळ म्हणाले की, विद्यार्थ्यांचे साहित्य प्रकाशित होण्यास संधी दिल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडते. नवनवीन माहिती देणारी पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे नमुद केले.
ग्रंथ महोत्सवानिमित्त निमंत्रिताचे कविसंमेलन आयेाजित करण्यात आले होते. यात जेष्ठ कवि राजेंद्र अत्रे, भाग्यश्री वाघमारे, बालाजी इंगळे, सुभाष चव्हाण, रुपेश जावळे, शेखर गिरी, विजय गायकवाड, पंडीत कांबळे, प्रभाकर जाधव, सुधीर कुलकर्णी, हनुमंत पडवळ, शंकर कसबे, पुष्पा क्षीरसागर, मधुकर हुजरे आदि कविंनी सहभाग घेवून आपल्या कविता सादर केल्या. कवि संमेलनाचे सूत्र संचलन रविंद्र केसकर यांनी केले. लोकसेवा विद्यालय गिरवली येथील कलाकार दस्तगीर पठाण यांनी वऱ्हाड निघालं लंडनला याचा एकपात्री नाटय प्रयोग सादर केला. कथाकथन कार्यक्रमात जेष्ठ कथागार योगीराज वाघमारे यांनी बंड, अरुण गिरी यांनी ममई व शिवराज मेनकुदळे यांनी पंधरा ऑगस्ट ही कथा सादर केली. सूत्र संचलन बालाजी तांबे यांनी केले. प्रास्ताविक बी. एस पाटील यांनीकेले. केंद्र प्रमुख राजाभाऊ गिरी यांनी आभार मानले.
याप्रसंगी 40 विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितेचे वाचन केले. ज्येष्ठ कवि डी. के. शेख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आभार मुकुंद राजेनिंबाळकर यांनी मानले. यावेळी कलदेव निंबाळा येथील सहशिक्षिका पुष्पा क्षीरसागर यांच्या बहर कवितांचा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.