पांगरी (गणेश गोडसे) :- भारतीय संस्कृती ही माता-पित्यांचा व ज्येष्ठांचा आदर व सन्मान करणारी असुन ती जतन करण्‍याची सर्वस्वी जबाबदारी ही आजच्या युवा वर्गाची असुन ते साध्य करण्‍यासाठीच प्रशालेत इतर पाश्‍चमात्य संस्कृतीच्या कार्यक्रमांना फाटा देत मातृ-पितृ पुजन दिन प्रतीवर्षी उत्साहात साजरा केला जातो, असे प्रतिपादन प्रतिक नारकर यांनी केले. ते पांगरी (ता. बार्शी) येथे सर्वोदय विदया मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविदयालयात आयोजित मातृ-पितृ दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी रज्जाक बागवान होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ.कौशल्या माळी, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सानप उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष बापुसाहेब नारकर, सचिव शशिकांत नारकर, प्राचार्य अशोक मुंढे, तृप्ती नारकर, ग्रामपंचायत सदस्य अमृत आरोळे, अकबर शेख, मुख्याध्यापक बालाजी कोकाटे, तात्या बोधे यांच्यासह पालक, ग्रामस्थ व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमासाठी उपस्थित माता-पिता व पालकांच्या पुजनानंतर विदयार्थी व पालकांनी आई-वडीलांची थोरवी कथन केली. कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्रशालेत वर्षभर घेण्‍यात येणा-या विविध उपक्रमांचे छायाचित्र व माहितीरूपी प्रदर्शन व स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शनाचेही आयोजन करण्‍यात आले होते. त्याचे उदघाटन बाबु काझी यांच्या हस्ते तर शशिकांत नारकर यांच्या अध्यक्षतेखाली कण्‍यात आले. आई-वडीलांना विसरू नका, दररोज आई-वडीलांचे दर्शन व आशिर्वाद घेऊनच शाळेत या असा मंत्र शशिकांत नारकर यांनी यावेळी दिला. सुत्रसंचालन सोमेश्‍वर घानेगावकर यांनी केले.
 
Top