उमरगा :- उमरगा तालुक्यातील सर्व टेलिफोन ग्राहकांसाठी शुक्रवार दि.28 रोजी दुपारी 12 वाजता बी. एस. एन. एल. कार्यालय, उमरगा येथे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात बी. एस. एन. एल विभागाच्या संदर्भात विविध योजनेची सांगोपांग चर्चा करण्यात येईल. या चर्चासत्रात वैयक्तिक तक्रारी स्वीकारले जाणार नाही, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप मंडल अभियंता (वाणिज्य) बी बी. एस. एन. एल प्रशासनिक भवन, सांजा रोड, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
