बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : असंघटीत कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणार्या राष्ट्रवादी जनरल कामगार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नवनाथ चांदणे यांची निवड करण्यात आल्याचे लेखी पत्र प्रदेश उपाध्यक्ष मधुकर शिंदे यांनी नुकतेच दिले आहे.
नवनाथ चांदणे यांनी दोनवेळा उपनगराध्यक्षपद, तीन वेळेस नगरसेवक, घरकुल संघर्ष समिती व अन्याय विरोधी आंदोलन संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटीत कामगारांच्या प्रश्नासाठी मागील पंचवीस वर्षांपसून काम केले आहे.