नळदुर्ग : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर (ता. तुळजापूर) येथील टोलनाका उस्मानाबाद जिल्हयातील मनसे कार्यकर्त्यांनी सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी बंद पाडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल वसुलीविरोधात एल्गार पुकारल्यानंतर त्याचे प्रतिसाद आता पाहायला मिळत आहेत.
       रविवारी पुणे येथील एसपी कॉलेजच्या मैदानात झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नी सरकार आणि कंपनींच्या टोलवसुलीच्या धोरणावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक टोलनाक्यांचा दाखला दिला होता. तसेच येणेगुरच्या टोलनाक्याचा उल्लेखही केला होता. त्यावरुन उस्मानाबाद जिल्ह्रयातील मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळपासूनच येणेगूर टोलनाका बंद पाडला आहे.
 
Top