नळदुर्ग  : आपल्या अंगाणातील चांगले गुण बाहेर आणण्याची आज खरी गरज असून सकारात्मक विचारच मानवाला ध्येयप्राप्ती करुन देतो, असे प्रतिपादन सोलापुर येथील समुपदेशक नानासाहेब साठे यांनी व्यक्त केले.
         नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयाच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी साठे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने व फित कापून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, उपप्राचार्य प्रा. एन.एम. माकणे, सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ. यु.बी. चनशेटटी यांनी केले.
           पुढे बोलताना नानासाहेब साठे म्हणाले की, सुख-दुख, चांगले-वाईट,  गरीब-श्रीमंत हे जीवनाचे घटक आहेत. त्याच्यात बदल होणे गरजेचे आहे. आपले कार्य विधायक असेल तर अंगी शक्ती निर्माण होते. जगातील सर्वात मोठे मिरॅकल हे आपले अंतरमन असते. त्यासाठी सकारात्मक विचार अंगी निर्माण होणे फार गरजेचे आहे. समस्येला मिठी मारणारा युवक हा कधीच यशस्वी होत नाही. जिवनाची खरी ओळख ही समस्या आहे. आपल्या अंगी असलेला विकनेस शोधून काढून सतत हसत राहा, यश तुमच्या पाठीशी राहील. मानवी मन जगातले सर्वात मोठे रहस्य आहे. त्यासाठी आजचे काम आजच करा. म्हणजे शरीरात पॉझिटीव्ह एनर्जी निर्माण होईल, आत्मविश्वासच माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. जिवनाचे सिध्दांत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवून विचाराचे बंधन अंगिकारणे गरजेचे आहे. जिवनाचे चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत. रात्री झोपताना आई-वडील, गुरु, परमेश्वर व धरणीमाता यांचे आभार माना, असेही ते शेवटी म्हणाले.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुहास पेशवे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार यांनी केले. तर विदयार्थी प्रतिनिधी दर्शन खारवे यानी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी विदयाथी-विदयार्थीनी मोठया संख्येनी उपस्थित होते.
 
Top