सोलापूर :- पंढरपूर येथील माघवारी 2014 निमित्त सर्व अन्न व्यावसायिकांनी किराणा दुकानदार, प्रासादिक भाडार, फळे व भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, माघवारी 2014 निमित्त भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात त्यानिमित्त अन्न व्यावसायिकांनी विक्री करण्यात येणा-या अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत ग्राहकांना खात्री दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारे अन्नपदार्थ हे दूषित होणार नाही तसेच अन्न पदार्थाचे साठा व विक्री करण्याचे ठिकाणी धुळ, किटकांचा प्रादुर्भाव, माशा इत्यादीपासून संरक्षित असावी. टाकाऊ अन्न पदार्थाच्या बाबतीत दक्षता घेऊन त्यापासून प्रदुषण होणार नाही याची खातरजमा करावी. कोणत्याही परिस्थितीत बुरशी आलेली, शिळे झालेले तयार अन्न पदार्थ समाप्तीची तारीख पाहूनच ग्राहकांना त्याची विक्री करावी. किराणा व्यावसायिकांनी भगर व भगर पिठ यांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत खबरदारीचा उपाय म्हणुन त्यांचे पुरवठादाराचे खरेदी बिले जवळ ठेवावी. तसेच केळी विक्रेते यांनी नैसर्गिकरित्या (भटृटी लावुन, शास्त्रियदृष्टया रॅपनिंग) करुन पिकविलेली केळी भाविकांना विक्री करावी. माघवारी काळात अन्न सुरक्षा अधिकारी यांचे पथक नेमण्यात आलेली असुन त्यांची नांवे व भ्रमणध्वनी क्र रा.मा.भरकड (9987051020) वि.रा.शेटे (7875447256) असा आहे. तसेच सर्व अन्न व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्याच्याकडील परवाना/ नोंदणी आस्थापनेमध्ये दर्शनी भागावर लावावे. विषयांकित कायद्याचे उल्लंघन करणा-या अन्न व्यावसायिकांविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 , नियम व नियमने 2011 अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी कळविले आहे.
 
Top