सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील मौजे शेलेवाडी (ता. मंगळवेढा) येथील मे. ज्योतिर्लिंग सहकारी दूध उत्पादक संस्था, शेलेवाडी ता. मंगळवेढा या आस्थापनेमध्ये भेसळकारी पदार्थ आढळून आल्यामूळे या आस्थापनेची अन्न व ओषध प्रशासनाकडे मंजूर करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.
    दुग्ध व्यावसायिकांनी दुध या अन्न पदार्थामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करु नये अन्यथा दुधामध्ये भेसळ करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमने 2011 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी केले आहे.
 
Top