बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुक्यातील संत बावी (आ.) येथे प.पू. बालव्यास श्री राधाकृष्णजी महाराज जोधपूर (राजस्थान) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची व या कार्यक्रमास पाच ते सहा जिल्ह्याहून श्रोते येणार असल्याची माहिती नियोजन समितीचे प्रमुख जुगलबापू तिवाडी व अंबऋषी महाराज यांनी दिली. 
    संत डोंगरे महाराज, किशोरजी व्यास यांच्या खालोखाल हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे राष्ट्रीय पातळीवरील संत म्हणून राधाकृष्णजी महराजांची ख्याती आहे. सतत 4 तास विनाथांबा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत आहेत. मराठी भाषा त्यांना बोलता येत नसली तरीही मराठीतील सुंदर भजने सादर करीत आहेत.
     अंबऋषी महाराजांनी वारकरी शिक्षणात पारंगत केलेल्या सुमारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसह पंढरपूर येथील कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय पातळीवरील राधाकृष्णजी महराजांच्या सत्संगात आल्यानंतर आपल्या गावी त्यांच्या कार्यक्रमाचा लाभ मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती.
     दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 श्रीमद भागवद ग्रंथ शोभायात्रा, दि.13 रोजी गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर प.पू.राधाकृष्णजी महाराज जोधपूर यांच्या हस्ते रस महोत्सव गोशाळेचे उद्घाटन करण्यात येत आहे. या गोशाळेची सुरुवात अकरा गायींचे पूजनाने होत आहे. दि. 11 रोजी रात्रौ 8.30 वा. पासून बार्शीतील जुन्या रेल्वेस्टेशन रोडवरील खटोड दाळ मिलच्या प्रांगणात भजन संध्या कार्यक्रम होत आहे. दि.12 रोजी सकाळी 6 वाजता बार्शीतील टाकणखार रोडवरील राम मंदिरापासून भगवंत मंदिरापर्यंत व पुन्हा राम मंदिरापर्यंत प्रभात फेरी काढण्यात येईल.
     हा धार्मिक कार्यक्रम दि. 7 ते 14 फेब्रुवारी 2014 पर्यंत श्रीकृष्ण मंदिर संस्थान, संतबावी येथे होत आहे. यामध्ये दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, प्रभात फेरी, स. 8 ते 11 गाथा भजन, दु.11 ते 2 प्रसाद, दु.2 ते 6 कथा, सायं.6 ते 7 हरिपाठ, सायं.7 ते 9 प्रसाद, रा.9 ते 11 हरिकिर्तन, रा. 11 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागर आदी दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.
     या कार्यक्रमात  हरिकिर्तनासाठी दि.7 रोजी ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले महाराज धामणगांव, दि.8 ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, दि. 9 ह.भ.प. डॉ.वेताळ महाराज मिरी ता. पाथर्डी, दि.10 ह.भ.प. राधाकृष्णजी महाराज जोधपूर, राजस्थान, दि.11 ह.भ.प. ज्ञानेश्वर पाटील महाराज वृंदावन धाम बावी, दि.12 ह.भ.प. पदमाकर महाराज देशमुख अमरावती, दि.13 ह.भ.प. कुमार महाराज केमदारणे लोणी,परंडा, दि. 14 रोजी ह.भ.प. रुपेश ढगे वृंदावन धाम बावी यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद होत आहे.
     संत बावी येथील अंबऋषी तात्या पाटील महाराज यांनी ट्रस्टमार्फत  सुमारे 7 ते 8 हजार लोकांची बैठक व्यवस्था असलेला भव्य मंडप, रात्री वास्तव्य करणार्‍या सुमारे पाचशे ते सातशे व्यक्तींच्या निवासाची सोय, एकावेळी दिड ते दोन हजार व्यक्तींच्या नाश्ता भोजनाची सोय, कार्यक्रमासाठी थेट प्रक्षेपण संच, विदयुत रोषणाई, बार्शीहून जाण्यायेण्यासाठी बसची सोय, तसेच सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
     या कार्यक्रङ्काच्या यशस्वीतेसाठी नियोजन समितीचे जुगलबापू तिवाडी, अंबऋषी महाराज, वाहन व्यवस्था समितीचे राजू मालू, गोविंद तापडियार, नवल सोमाणी, सांस्कृतिक समितीचे रमेश सोमाणी, योगेश खंडेलवाल, देवकीनंदन खटोड, वैदयकीय समितीचे डॉ. लक्ष्मीकांत काबरा, मंडप व बैठक व्यवस्था समितीचे टिल्लू जाजू, जगदिश भराडिया, गिरीश बजाज, वाहन कमिटीचे नागेश पाटील, नागनाथ आगलावे, भोजन व्यवस्था समितीचे गोपालदास हेड्डा, निवास समितीचे सतिश पाटील, छगन आगलावे, महिला समितीच्या सौ.शोभा पल्लोड, राजकमल हेड्डा, अरुणा तापिडया, डॉ.श्वेतल सोमाणी, ललिता भराडिया व राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्या, प्रसिध्दी समितीचे प्रशांत घोडके, विजय निलाखे, प्रशांत काळे विद्युत समितीचे मच्छिंद्र खोपले मेजर, भिमराव पाटील, दास पुरोहित, स्वागत समितीचे दौलतरामजी चांडक, सतीश चंद्रजाजू, सुदर्शन मुंदडा, विठ्ठल दायमा, बिपिनभाई पटेल, रमणजी गिलडा, रामचंद्र सोमाणी, हरिप्रसाद जाजू, योगेश पाटील, गजेंद्र काकडे, विजयभाई पटेल आदी परिश्रम घेत आहेत.
 
 
Top