![]() |
सुरेश देशमुख |
भूम -: परंडा विधानसभा युवक काँग्रेसचे नुतन अध्यक्ष सुरेश गोवर्धन देशमुख (वय ३०) हे मोटार सायकलवरून जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अपघात होऊन ते जागीच ठार झाले. त्यांच्या समवेत मोटार सायकल स्वार असणारे संतोष डोंलबाळे हे गंभिररित्या जखमी झाले आहेत. ही घटना सरमकुंडी ता. वाशी येथे बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. डोंबाळे यांची प्रकृती चिंताजनक असुन त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी देशमुख हे दुचाकीवरून (एमएच 25, 9403) वाशीहून ईटकडे जात होते. दुसर्या दुचाकीवरून (क्रमांक नमूद नाही) त्यांचे मित्र संतोष डोंबाळेसोबत जात होते. दोघेही यशवंडी पाटीजवळच्या रेणुका पेट्रोलपंपाजवळ आले. तेव्हा एका वाहनाने दोघांनाही हुलकावणी दिली. यामुळे दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोन्ही दुचाकी एकमेकांना धडकल्या. यात देशमुख यांना छाती व डोक्यात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर डोंबाळे हे गंभीर जखमी झाले.
सुरेश गोवर्धन देशमुख यांची दोन दिवसापूर्वीच परंडा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने वर्तमानपत्रातील जाहीरातीद्वारे, फोनवरून व प्रत्यक्ष भेटून अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता. अभिनंदनाचा वर्षाव सुरू असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या दु:खद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.