पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) येथील शिक्षण सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष व प्राचार्य कै. दिलीप नारकर यांचा स्मृतीदिन प्रशालेत विविध सामाजीक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्मृतीदिन हा सहकार्य दिन म्हणुन साजरा करण्यात आला. या निमित्त रक्तदान शिबीर, शालेय विदयार्थी नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थांनी रक्तदान शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. पांगरी ग्रामिण रूग्णालयाच्या वैदयकिय अधिका-यांनी नेत्र तपासणी करून मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या प्रांगनात दुपारी आदरांजली वाहण्याचा व गितमालेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रशालेच्या माजी विदयार्थांनी व शिक्षकांनी कै.दिलीप सरांच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थाध्यक्ष बापु नारकर यांनी दिलीप नारकर यांनी विविध क्षेत्रात केलेल्या भरीव कामाचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. संगीत शिक्षक बडवे व त्यांच्या सहका-यांनी काव्यवाचन व गीतमालेतुन कै.नारकर यांना श्रध्दांजली वाहीली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापु नारकर होते. यावेळी सचिव शशिकांत नारकर, संस्था सदस्य प्रतीक नारकर, प्राचार्य अशोक मुंढे, मोहन घावटे, माणिक धावणे, अमृत आरोळे यांच्यासह प्रशालेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन उमेश देशपांडे यांनी केले.