उस्मानाबाद -: बंधपत्रीत नर्सेस आणि ब्रदर्स यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे,या मागणीसाठी कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदान येथे दि.११ फेब्रुवारपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगण्यात आले.
राज्यातील जिल्हा रूग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयात सन २००६ पासून १३९५ नर्सेस आणि ब्रदर्स कंत्राटी पध्दतीवर काम करीत आहेत.त्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे,अशी मागणी संघटनेच्यावतीने अनेकवेळा करण्यात आली,परंतु आरोग्य खात्याने त्यांच्या मागणीसाठी दुर्लक्ष केले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना वेळोवेळी निवेदने देवूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे हे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे