नवी दिल्ली - भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि एच-इंडेक्स ऑफ १०० मध्ये पोहचणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांना मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या सोहळ्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू असून या पुरस्काराने सन्मानित होणारा सर्वात तरुण भारतीय आहे. या सोहळ्यासाठी सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा उपस्थित आहेत. तर, राव यांच्या पत्नी आणि त्यांचा पुत्र देखील उपस्थित आहे. कोटयावधी क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देणारा सचिन हा सर्वोच्च नागरी पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय क्रीडापटू आहे.