उस्मानाबाद -: कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी शेतकरी जनता अपघात विमा योजनेतंर्गत मयत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना 1 लाख रुपये तर अपघातात 50 टक्के पेक्षा जास्त दुखापत झालेल्या शेतकऱ्यांस 50 हजार रुपये देण्यात येतात. जिल्ह्यात सन 2011-12 मध्ये 130 प्रस्ताव प्रकरणांपैकी 99 शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. तर सन 2012-13 मध्ये एकूण 147 प्रस्ताव प्रकरणापैकी 84 जणांना लाभ मिळाला असून उर्वरित लाभ देण्याविषयीची कार्यवाही सुरु आहे. सन 2013-14 या वर्षात जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी या बैठकीत केले.
      दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेतला म्हणाले की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत  ए.पी.एल.लाभार्थी - 2 लाख 5 हजार 204, बी.पी.एल.1 लाख 6 हजार 639, अंत्योदय- 38 हजार 204 अन्नपूर्णा 841 तर शुभ्र शिधापत्रिका लाभार्थ्यांची संख्या 9 हजार 379 असे एकूण 3 लाख 60 हजार 267 अशी आहेत. सर्व शिघापत्रिका धारकांना गहु,तांदूळ,साखर व केरोसिनचे व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर वाटप  करण्यात यावे. याकामी राहिलेली प्रलंबित कामे युध्दपातळीवर करुन घेण्यात यावी, असे सांगून पुढे म्हणाले की, अपात्र शिघापत्रिका धारकांनी कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य घेऊ नये. असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही होईल, असे निर्देशही संबंधित यंत्रणेला दिले.
   जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा घेताना म्हणाले की, नागरी हक्क व संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदयातंर्गत 31 जानेवारी,2014 पर्यंत  पोलीस तपासावरील 17 गुन्हे नोंद आहेत. या गुन्हांचा तपास तातडीने 3 महिन्यात करुन या तपासाचा अहवाल दक्षता समितीस देण्याचे, निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
         प्रारंभी लोकशाही दिनानिमित्त नागरिकांकडून आलेल्या निवेदने स्विकारुन त्यावर सकारात्मक विचार करुन प्रकरण तात्काळ निकाली काढवीत. अनुपस्थित विभागांना पुढील लोकशाही दिनास उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात,असे निर्देशही डॉ.नागरगोजे यांनी यावेळी दिले.
        या बैठकीस अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शिल्पा करमरकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, शंकर तोटावार, सहायक आयुक्त समाजकल्याण अनिल शेंदारकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिरासे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.के.भांगे तसेच संबंधित कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती.                
 
Top