बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जुने पोलीस वाहन खरेदी केल्यानंतर रक्कम घेऊनही कागद पत्र दिले नसल्याने कागदपत्रात अफरातफर करुन फसवणूक केल्याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदरच्या फिर्यादीवरुन बार्शी न्यायालयाने चौकशी करुन तपासाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
     यातील फसवणूक झालेले शिवाजी लिंबाजी देवकते (वय 72 रा.कुर्डूवाडी रोड,बार्शी) असे नाव असून ज्यांच्याविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली ते युवराज अशोक उपळाईकर (रा.बार्शी( आणि सिचन गणपत लांडगे (रा.कुर्डूवाडी) असे तक्रारीतील आरोपींची नावे आहेत.
     देवकते यांनी शेतीच्या कामासाठी जुने चारचाकी जिप्सी मारुती वाहन खरेदी केले. सदरचे वाहन खरेदी व्यवहाराची रक्कम दिल्यानंतरही कागद पत्र मिळाले नसल्याने त्यांनी काही दिवस वाट पाहून त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली. पोलिसांकडून तक्रारीची दखल घेऊन तपास होत नसल्याने बार्शी न्यायालयात सदरची फिर्याद दाखल करण्यात आली. बार्शी न्यायालयाने सदरच्या तक्रारीची नोंद करुन अहवाल कळवण्याचे आदेश बार्शी पोलिसांना देण्यात आले आहे.
     सदरचे वाहन हे पोलिसांचे वाहन असल्याने यामध्ये जास्त गुंतागुंत झाली आहे आणि फसवणूक झालेले गृहस्थ मागील अनेक महिन्यांपासून न्यायासाठी लढत असून त्यांना मोठ्या धैर्याने मुकाबला करण्याची वेळ आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून रक्कम देऊन ताब्यात घेतलेले वाहन आपल्या नावावर होत नसल्याने त्यांना प्रचंड मानिसक त्रास झाला असल्याने असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. न्यायालयाकडून आलेल्या आदेशावरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक अिभषेक डाके हे पुढील चौकशी करीत आहेत.
 
Top