नळदुर्ग :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जयंतीचे औचित्‍य साधून नळदुर्ग शहर कॉंग्रेस सेवा दलाचे अध्‍यक्ष विनायक अहंकारी यांच्‍या निवासस्‍थानी 'हिंदवी स्‍वराजाचे संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज' यांच्‍या पुतळ्यास अभिषेक करुन उत्‍साहात जयंती साजरी करण्‍यात आली.
    बुधवार रोजी विनायक अहंकारी यांच्‍या निवासस्‍थानी छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास प्रमुख अतिथींच्‍या हस्‍ते अभिषेक करुन पुतळ्याचे पूजन करण्‍यात आले. याप्रसंगी अॅड. अरविंद बेडगे, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, अंबाबाई देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष रमेश जाधव, जिर्णोध्‍दार समितीचे अध्‍यक्ष शरद बागल, कॉंग्रेसचे नगरसेवक नितीन कासार, माजी नगरसेवक अमृत पुदाले, भाजपाचे शहराध्‍यक्ष पद्माकर घोडके, भाजपाचे सुशांत भूमकर आदींची प्रमुख उ‍पस्थिती होती. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या कार्याविषयी अनेकांनी आपले विचार व्‍यक्‍त करुन त्‍यांचे विचार आचरणात आणण्‍याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विनायक अहंकारी यांनी केले.
      नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, युवासेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, पत्रकार शिवाजी नाईक, अध्‍यक्ष सोमनाथ म्‍हेत्रे, उपाध्‍यक्ष राज मुरमे, राहुल घोडके, श्रीकांत जाधव, सचिन शिंदे, रोहेश माने, अमित गायकवाड, नामदेव कदम, यानंद गायकवाड, रमेश घोडके, शशिकांत जाधव, अरुण जाधव, विलास मोरे, रमेश अंधारे, बंटी गायकवाड, रुपेश माने आदीजण उपस्थित होते.
 
Top