बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. उस्‍मानाबाद मतदार संघासाठी पक्षपातळीवर चर्चा सुरु आहे, बार्शीतील तुळशीराम रोड येथील संपर्क कार्यालयाचा शुभारंभ सोलापूर येथील चंदूभाई देढीया यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.
    यावेळी राजेशसिंह दौडमणी, एम. एम. बागवान, विक्रम सावळे, ऍड्.श्रीकांत सुरवसे, सिकंदर आतार, अब्दूलभाई शेख, महेश केदार, श्रीकांत सुरवसे आदी उपस्थित होते. जिल्हा संयोजक देढीया यांनी यावेळी बोलतांना पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद विसरुन पक्ष देईल तो उमेदवार विजयी करण्यासाठी तळमळीने काम करावे असे म्हटले. सिकंदर आतार यांनी बोलतांना गावपातळीपर्यंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन यापुढे चांगल्या पध्दतीने काम करण्यात येईल. प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे आपल्या जीवाची पर्वा न करता आम आदमी पाटीचे कार्य करावे असे म्हटले. विक्रम सावळे यांनी मतदारसंघातील सविस्तर माहिती सांगत पार्टीच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. हमीद मणियार यांनी संपर्क कार्यालयासाठी विनामूल्य जाग उपलब्ध करुन दिल्याबद्दत त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
Top