सोलापूर :- आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीन सन 2014-15 या वर्षात अनुसूचित जमातीच्या इ. 1 ली च्या प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेसाठी विधवा/ घटस्फोटीत/ निराधार/ परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्याचा जन्म 1 जून 2009 ते 1 जून 2010 दरम्यान झालेला असावा. जन्म तारखेसाठी ग्रामसेवक अथवा अंगणवाडीचा दाखला देण्यात यावा. तसेच रुपये एक लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा व सक्षम अधिका-याचे जातीचे प्रमाणपत्र असलेल्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर, उत्तर सोलापूर तहसिल कार्यालय इमारत, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सोलापूर येथे दिनांक 25 मार्च 2014 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.(संपर्कासाठी दुरध्वनी क्र. 0217- 2311600)