सोलापूर :- पंढरपूर शहरामध्ये दि. 10 फेब्रुवारी 2014 रोजीच्या माघशुध्द एकादशीनिमित्त भरणारी यात्रा   दि. 4 फेब्रुवारी 2014 ते 18 फेब्रुवारी 2014 या कालावधीत सुरु होत आहे. यात्रेस यात्रेकरुंनी पुढील काळजी घेण्याचे आवाहन न.प. पंढरपूरचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.
    पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये, शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा, नदीच्या पात्रात, सार्वजनिक जागेत, अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये, यात्रेकरुंनी नदीचे पाणी पिऊ नये, नगरपरिषदेच्या नळाचे पाणी प्यावे, नासकी, कच्ची फळे खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये, आपल्या घर, मठ, धर्मशाळा, दुकान या ठिकाणचा कचरा कचरा डब्यामध्ये साठवून तो घंटागाडी कडे द्यावा.रस्त्यावी किंवा इतर ठिकाणी टाकल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. शहरातील नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत बांधून ठेवावीत, मोकाट जनावरे पकडून कोंडवड्यात ठेवली जातील अथवा शहराबाहेर सोडली जातील याची नोंद जनावरांच्या मालकांनी घ्यावी.
 
Top