कळंब (भिकाजी जाधव) :- समाजातील स्वच्छ प्रतिमा असलेल्या नागरिकांनी राजकारणात येऊन भ्रष्टाचाराला विरोधा करावा, असे आवाहन सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी केले.
कळंब येथील नगरपालिका कार्यालयासमोर रविवार रोजी आम आदमी पार्टीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांढरे हे बोलत होते.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय सावळे, आम आदमीचे जिल्हा संयोजक केरबा गाढवे, तालुका संयोजक दत्तात्रय तानपुरे, शेतकरी संघटनेचे रामजीवन बोंदर, विलास सुरवसे, अशोक चोंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना विजय पांढरे म्हणाले की,आगामी लोकसभा व
विधानसभेच्या निवडणुका ही परिवर्तनासाठीची मोठी संधी असून या
निवडणुकांद्वारे चांगल्या लोकप्रतिनिधीची निवड करणे गरजेचे आहे.
यावेळी रामजीवन बोंदर, विजय सावळे, दत्तात्रय तानपुरे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास कळंब शहर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.