कळंब (भिकाजी जाधव) :- कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथे वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार बायफ रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर पुणे व महात्मा फुले बहुउददेशीय सामाजिक संस्था हासेगाव (केज) यांच्यावतीने ग्रामीण भागातील घराच्या सांडपाण्यावर भाजीपाला लागवड करणे व एक चांगले असे परसबाग करणे हा कार्यक्रम संपन्न झाला.
संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील लोकांसाठी याची जनजागृती करण्यात आली. तसेच संस्थेच्यावतीने सांडपाण्यावर आधारीत अळूच्या पानांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भागवत तोडकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तन शेतकरी गटाचे परिक्षिती पाटील हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास तोडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माणिक आरकडे, गोरोबा कोरे, ज्ञानेश्वर तोडकर, प्रदीप यादव, किरण खरडकर, पांडुरंग तोडकर, लक्ष्मी तोडकर, काशिबाई यादव, स्वप्नाली तोडकर, कमल खरडकर आदींनी परिश्रम घेतले.