उस्मानाबाद -: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध शासकीय कार्यालयांसह अनेक संस्था, सामाजिक संघटना यांनीही शिवजयंती उत्साहात साजरी केली. लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनीही अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.  शिवजयंतीनिमित्त शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.
      तुळजापूर आणि उस्मानाबाद येथे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
        शिवजयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
       जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, राम मिराशे, तहसीलदार राजश्री मोरे, जीवन कुलकर्णी, चंद्रकांत शिंदे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयात शिवजयंती साजरी
येथील जिल्हा माहिती कार्यालयातही आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह अर्जून परदेशी, अशोक माळगे, शंकर शेळके, अयुब पठाण, नरहरी गुट्टे, सिद्धेश्वर कोंपले, अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, श्रीमती चित्रा घोडके, तानाजी सुरवसे आदींची यावेळी उपस्थिती होती. 
 
Top