नळदुर्ग : जळकोट (ता. तुळजापूर) येथे एका विवाहितेस कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पन्नास हजार रुपये आणावे, याकरीता सासरच्यांनी तिचा छळ केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सारिका अमोल जाधव (२६, रा.जळकोट, ता. तुळजापूर) असे छळ झालेल्या विवाहितीचे नाव असून पती अमोल अशोक जाधव, सासू कुसुम अशोक जाधव, नणंद शिल्पा रणजित बिराजदार (रा. मळगी) व कविता दयानंद डावकरे (कात्रज, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. सारिका जाधव हिचा तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. येथील अमोल अशोक जाधव याच्याशी 2009 मध्ये लग्न झाले होते. दरम्यानच्या काळात सारिकाच्या सासर्‍याचा मृत्यू झाल्याने तू पांढर्‍या पायाची आहेस, असे म्हणून अपमानित करून शिवीगाळ, भांडणतंटा, शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची व जिवितास धोका असल्याची फिर्याद सारिका जाधव हिने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन वरील चौघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड हे करीत आहेत.
 
Top