बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शेळीला जखमी केल्यामुळे झालेल्या भांडणात कुर्हाडीने हल्ला करुन एकास जखमी केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाचे न्यायाधिश व्ही.बी.मुल्ला यांनी आरोपी श्रीमंत रामु माळी (रा.मानेगाव) यास एक वर्षाची साधी कैद व एक हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास आणखी तीन महिने जादा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
मानेगाव (ता. बार्शी) येथील शेतजमीन गट नं.467 व 468 येथे सन 2003 मध्ये सदरची घटना घडली. याबाबत वैराग पोलिसांत जखमी नवनाथ गोपाळ ताटे (रा. मानेगाव) यांनी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सात साक्षीदारांच्या साक्षी तपासणी अंती शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे ॲड्. प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले.