बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : खांडवी (ता.बार्शी) येथे महिलेशी असभ्य आणि लज्जास्पद वर्तन करणार्‍या बाबासाहेब भागवत गव्हाणे यास दोन वेगवेगळ्या कलमांत दोषी ठरवत बार्शी न्यायालयाचे न्यायधिश व्ही.बी.मुल्ला यांनी सहा महिन्यांची साधी कैद व एक हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
     जानेवारी 2009 मध्ये सदरची घटना खांडवी येथे मिहला एकटी घरात असतांना घडली. यावेळी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन वैराग पोलिसांत 354, 452 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहा साक्षीदारांच्या साक्षी तपासून गुन्ह्यात दोषी आढळलेल्या आरोपी गव्हाणे यास न्या.मुल्ला यांनी शिक्षा सुनावली. फिर्यादीतर्फे ॲड्. आर.यु.वैद्य, सरकारतर्फे ॲड्.प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले.
 
Top