उस्मानाबाद :- 20 टक्क्यांपेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळा शासनाने बंद करू नये, यासह इतर प्रश्नांसाठी 15 फेब्रुवारी रोजी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कर्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 20 टक्क्यांपेक्षा विद्यार्थ्यांची कमी पटसंख्या असल्यास त्या शाळा बंद करून नजीकच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, 2014-15 या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो प्राथमिक शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार आहे. जिल्ह्यातील जवळपास 125 शाळा या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या आहेत. या शाळा बंद झाल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे या शाळा बंद करू नये, यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
Top