उस्मानाबाद :- जालनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांच्यानंतर उस्मानाबादला नव्या दमाचा तरुण आयएएस केडरचा जिल्हाधिकारी मिळाला आहे.
डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या बदलीनंतर उस्मानाबादला कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर बी. राधाकृष्णन यांची बदली झाल्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. बी. राधाकृष्णन् हे 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे तामिळनाडूचे आहेत. जालना जिल्हा परिषदेत सीईओ पदावर कार्यरत होते. त्यांनी जालना जिल्ह्यात लोकसहभागातून 10 हजार वनराई बंधारे बांधले. दुष्काळी स्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी शाम देशपांडे यांच्यासमवेत त्यांनी ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ाची कामे मोठय़ा प्रमाणावर मार्गी लावली. काही भागात अचानक भेटी देऊन कामचुकार अधिकार्यांवर कारवाईही केली. डॉ. प्रवीण गेडाम यांच्यानंतर राधाकृष्णन यांच्या माध्यमातून नव्या दमाचा जिल्हाधिकारी मिळाला आहे.