सोलापूर -: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम हा गरीबांना हक्काचे धान्य मिळण्याचा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले.
सोलापूर जिल्हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. प्रणिती शिंदे, आ. दिलीपराव माने, माजी राज्यमंत्री सिध्दराम म्हत्रे, धर्मा भोसले, बाळासाहेब शेळके, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, अन्न धान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार आदिंची प्रमुख उपिस्थती होती.
योवळी बोलतांना गृहमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट़्रीय अन्न सुरक्षा कायद्यामुळे संपूर्णदेशात कमी दरात हक्काचे धान्य मिळणार आहे. महागाईच्या काळात लोकांना चांगले व स्वच्छ अन्न मिळावे यासाठी शासनाने हा कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
आज देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून बाहेर देशांना धान्य आपण निर्यात करीत आहोत. गॅस सिलेंडरबाबतीतील लोकांची तक्रारीची दखल घेवून पूर्वीप्रमाणे सिलेंडर देण्याचे शासनाने निर्णय घेतला असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यात या महत्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने चांगले नियोजन केले याची चांगली अंमलबजावणी व्हावी अशा सूचना सर्व तालुकास्तरीय अधिका-यांना देण्याचे श्री. शिंदे यांनी सूचित केले.
याप्रसंगी आ. प्रणिती शिंदे यांनी या कायद्यामुळे धान्य मिळण्यासाठी गरीबांची पिळवणूक होणार नाही. या महत्वाकांक्षी कार्यक्रमामुळे स्वप्नातले दिवस सत्यात आले असल्याचे सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविकात म्हणाले की, जिल्ह्यात या महत्वाकांक्षी कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. पूर्वी देण्यात येणारे धान्य योजनेखाली सुरु होते. आता कायद्याप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे निर्धारित धान्य मिळण्याचा लाभार्थींना अधिकार प्रापत झाला आहे. सोलापूर शहरासाठी दरमहा 2100 मे. टनापेक्षा जास्त धान्याचे वितरण केले जाणार आहे. याबाबत प्रशासनाने यापूर्वीच पूर्वतयारी केली आहे. या अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रमात पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जातील. शेवटच्या लाभार्थीपर्यंत धान्या पोहोचले पाहिजे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.
यावेळी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात गृहमंत्री शिंदे यांच्या हस्ते धान्य देण्यात आले.