सोलापूर -: दुष्काळी परिस्थितीचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध तलावातील गाळ काढून, जलसंवर्धनाची कामे करुन पाण्याची पातळी वाढविण्याचे राष्ट्रीय काम केले असल्याचे गौरवोदगार केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी काढले.
येथील रंगभवनामध्ये दुष्काळ निवारणार्थ उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था, प्रसार माध्यमे व शासकीय अधिका-यांचा त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशिगंधा माळी, आ. भारत भालके, आ, सिद्रामप्पा पाटील, माजी राज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, पोलीस अधिक्षक राजेश प्रधान, उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी शहाजी पवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना गृहमंत्री शिंदे म्हणाले की, दुष्काळाच्या अतिशय कठीण काळात जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली शासकीय यंत्रणेबरोरबच विविध संस्था, प्रसार माध्यमे, विविध पक्षांनी एकत्र येवून पाणी पातळी वाढविणे यातून राष्ट्रीय उत्पादन वाढीसाठीचे राष्ट्रीय कार्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
मागील वर्षीचा दुष्काळ मोठा कठीण होता अशा प्रसंगी टँकरद्वारे पाणी पुरवठा, चारा छावण्या, सुरु करणे या बरोबरच गाळ काढा-पाणी अडवा, पाण्याची साठवण करा अशी योजना ग्रामीण भागात अतिशय यशस्वीपणे राबवून अतिशय चांगले काम जिल्ह्यात झाले. अशा चांगल्या काम करणा-यांचा सत्कार करुन त्यांच्या पाटीवर शाब्बासकीची थाप देण्यासाठी सत्कारांचा अभिनव उपक्रम प्रशासनाने राबविल्याबद्दलही ना. शिंदे यांनी अभिनंदन केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनतर प्रास्ताविकात म्हणाले की, मागील वर्षी जिल्ह्यात अतिशय भीषण दुष्काळ होता. 100 टक्के गावे 50 टक्के आणेवारीपेक्षा कमी होती. जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर होता. पाणीसाठा कमी होत चालला होता, भुजल पातळी सरासरीपेक्षा कमी होत चालली होती. कमी होत जाणारा पाणी साठा गृहित धरुन नियोजन केले गेले, अशा या आपत्तीच्याकाळात गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले. राज्यात सर्वाधिक गाळ या काळात जिल्ह्यात काढला गेला. शासकीय यंत्रणेबरोबरच, विविध सहकारी संस्था उद्योजक, स्वयंसेवी संस्था, प्रसर माध्यमांनी यामध्ये हातभार लावला. प्रसार माध्यमांनी शासनाची व प्रशासनाची भूमिका जनतेपर्यंत पहोचविण्याचे व जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे चांगले कार्य केले. या सर्वांना प्रोत्साहन मिळावे, कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मिळावी यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.