उस्मानाबाद -: राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने उस्मानाबाद येथे दि. 4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत ग्रंथोत्सव-2014 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ख्यातनाम ग्रामीण कथाकार व साहित्यिक प्रा. डॉ.भास्कर चंदनशिव आणि जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांच्या हस्ते दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता या ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. मराठवाड्यासह राज्यभरातील ग्रंथविक्रेत्यांचा सहभाग, शासकीय प्रकाशनांची उपलब्धता आणि साहित्यविषयक उपक्रमांची रेलचेल हे या ग्रंथोत्सवाचे वैशिष्ट्य राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर येथे हा ग्रंथोत्सव होणार आहे.
यावर्षी शहराच्या विविध शाळा-महाविद्यालयांतून निघणारी ग्रंथदिंडी, प्रसिद्ध कवी-गीतकार-चित्रपट अभिनेते किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व ख्यातनाम वकील रुचिर कुलकर्णी या जोडीशी मनमोकळ्या गप्पा, वैज्ञानिक जिज्ञासा जागविणारा कुतूहल विज्ञानाचे हा कार्यक्रम आणि जिल्ह्यातील मान्यवर कवींची बहारदार काव्यमैफील आणि विविध विषयांवरील पुस्तक खरेदी करण्याची ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी संधी हे याचे वैशिष्ट्य राहणार आहे.
दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शहरातील विविध भागातून ग्रंथफेरी काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, औरंगाबाद विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ह.रा. डेंगळे आदींची उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सामाजिक भान जपणारे कवी-गीतकार-चित्रपट अभिनेते किशोर कदम यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे तसेच तीनही दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहणाऱ्या ग्रंथप्रदर्शनातील पुस्तक विक्रीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.