सोलापूर :- जिल्हा प्रशासनाने समाधान विस्तारित योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि दाखले देऊन राष्ट्रीय काम केले आहे असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे शिवचलेश्वर प्रशालेत सुवर्ण जयंती राजस्व अभियान 2013-14 अंतर्गत समाधान विस्तारित योजना शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या 12 विभागातील 55 योजनांचा लाभ आणि दाखले 21 हजार 98 लाभार्थ्यांना देण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात केंद्रिय गृहमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजना आणि इतर दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी केंद्रिय गृहमंत्री बोलत होते. व्यासपिठावर आ. सिद्रमप्पा पाटील, माजी मंत्री आनंदराव देवकते, सिध्दाराम म्हेत्रे, माजी आ. विश्वनाथ्ज्ञ चाकोते, अक्कलकोट पंचायत समिती सभापती विमल गव्हाणे, मैंदर्गीच्या नगराध्यक्षा महानंदा सवळी, माजी महापौर नलिनी चंदेले, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि सहाय्यक जिल्हाधिकारी कुणाल खेमनार उपस्थित होते.
केंद्रिय गृहमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, विस्तारित समाधान योजनांचे शिबीर आयोजित करुन जिल्हा प्रशासन लोकशाहीचा खरा अर्थ जनतेपर्यंत पोहोचवित आहे. आज स्वत: सरकार जनेच्या घरात आलयं. दाखले देण्याच्या या महायज्ञामध्ये सर्व शासकीय योजनांचा लाभ सामान्यातील सामान्य गरीब जनतेला मिळत आहे. लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकशाही खंबीर करण्याचं काम जिल्ह्यात होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने समाधान विस्तारित योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि दाखले देऊन राष्ट्रीय काम केले असल्याचे ते म्हणाले.
हा दाखले वाटप कार्यक्रम राबवून जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी कौतुकास्पद कार्य क्रेले आहे. यामध्ये सर्व शिक्षकांनी महत्वाची भूमिका त्यांच्या सहकार्यातून पार पाडली आहे. आता सर्व तरुणांना दाखले मिळाल्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे. भविष्याचा पाया उभा करीत भारताची इमारत पक्की करण्याकरता शासन आपल्यापर्यंत येत आहे. त्यांना प्रतिसाद देऊन बलशाली भारताचे स्वप्न सत्यात आणण्यास मदत करण्याचे आवाहन केंद्रिय गृहमंत्र्यांनी यावेळी तरुणांना व विद्यार्थ्यांना केले.
मैंदर्गी येथील हातमाग उद्योगासाठी भारत सरकारकडुन भविष्यात शक्य तेवढी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
आ. पाटील यावेळी म्हणाले की, अशा प्रकारचे दाखले वाटपाचे काम संपूर्ण जिल्ह्यात केले पाहिजे.
म्हेत्रे यावेळी म्हणाले की, विस्तारित समाधान योजनेमुळे सर्वांना आवश्यक कागदपत्रे मिळतील. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सुलभरितीने सर्व दाखले मिळण्याकरीता अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांची शाळांची कामे दाखल्यावाचुन अडणार नाही. लोकांचा वेळ, श्रम वाचविणारा हा स्तुत्य उपक्रम निरंतर चालु ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी या शिबीर आयोजना मागचा उद्देश सांगुन, येत्या मार्च ते मे महिन्यात विद्याथ्या्रंना त्यांचे सर्व दाखले शाळांमध्येच देण्यात येतील असे सांगितले. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असून शासनाचे विविध योजनांचे लाभ शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व प्रयत्न अशा प्रकारच्या शिबीरांच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. पठाण, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक किशोर ठाकरे, अक्कलकोटचे तहसिलदार रामलींग चव्हाण, जिल्हा क्रीडाअधिकारी भाग्यश्री बिले, मैंदर्गीचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित डोके, शिवचलेश्वर प्रशालेचे अध्यक्ष डॉ. ए. जी. पाटील यांच्यासह इतर राजकीय नेते, पक्ष प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.