उस्मानाबाद :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, उस्मानाबादच्यावतीने जिल्हास्तरीय युवा दिन व युवा सप्ताहानिमित्त सामुहिक सुर्यनमस्कार व मॅरॉथॉन स्पर्धा दि. 13 ते 14 या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.सामुहिक सुर्यनमस्काराचे आयेाजन दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कसबे तडवळे, जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय,आळणी, सरस्वती विद्यालय, बेंबळी आणि तेरणा पब्लिक स्कुल, उस्मानाबाद, उमरगा येथील बरवेश्वर विद्यालय आणि कळंब येथील शहीद भगतसिंह विद्यालयात आयोजिण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धा दि. 14 रोजी सकाळी 7 वाजता वरुडा रोड, तुळजापूर बायपास, उस्मानाबाद येथे स्पर्धा घेण्यात येईल आणि दुपारी 1 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम उस्मानाबाद येथे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल. संबंधित शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नेांदवावा. स्पर्धा विषयक प्रवेशिका 12 फेब्रुवारी रोजी स्पर्धा स्थळी किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय श्रीतुळजाभवानी स्टेडियम, उस्मानाबाद येथे सादर करावी.
जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन युवक व युवतीसाठी वेगवेगळया गटामध्ये स्पर्धा आयोजन करण्यात यावे. स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडुंना प्रथम एक हजार, व्दितीय 700 व तृतीय क्रमाक 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. युवक-युवतींना वेगवेगळे पारितोषिक देण्यात येईल, असे यांनी कळविले आहे.
