उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल,2014 ते मार्च,2014  या कालावधीत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याची माहिती  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
          यानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका पुढीलप्रमाणे आहेत. वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी, फक्राबाद, तुळजापूर तालुक्यातील व्होर्टी व वडाचा तांडा. ग्रामपंचायत पोटनिवडणूका- उस्मानाबाद  तालुक्यातील कुमाळवाडी  (अनुसूचित जमाती), गोवर्धनवाडी / थोडसरवाडी (अ. ज. स्त्री), गोपाळवाडी (अनूचित जमाती स्त्री), देवळाली  ( अनुसूचित जाती स्त्री ), तुळजापूर तालुक्यातील बोरगांव व नांदुरी (अनुसूचित जाती), उमरगा तालुक्यातील कदमापूर / दुधनाळा (अनुसूचित जाती), जकेकुर (ना. मा. प्र), आनंदनगर (अनसूचित जाती  स्त्री ), रामपूर (ना. मा. प्र. स्त्री ), दाबका (ना. मा. प्र ), दाबका (ना. मा. प्र. स्त्री ), नागराळ गुंजोटी (ना. मा. प्र.), नागराळ गुंजोटी (ना. मा. प्र. स्त्री), कोरेगाववाडी (ना. मा. प्र. स्त्री), लोहारा तालुक्यातील बेंडकाळ (सर्वसाधारण), बेंडकाळ (ना. मा. प्र. स्त्री), आरणी (ना. मा. प्र. स्त्री ), कमालपूर (ना. मा. प्र. स्त्री), मोघा बु (अनु. जाती स्त्री ), मुर्शदपूर (अनु. जाती स्त्री ), मुर्शदपूर (ना. मा. प्र.), चिंचोली रेबे (अनु.जाती.स्त्री ), आणि चिंचोली रेबे (ना. मा. प्र. स्त्री )  या प्रवर्गासाठी  राखीव आहेत.
    यानुसार हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी असून मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 3 चे पोटनियम 5 नुसार मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करणे व अंतिम यादी प्रसिध्द करण्याची तारीख गुरुवार, दि. 20 फेब्रुवारी,2014 ही आहे.  
 
Top