उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे विविध  शिष्यवृत्तीची  योजना राबविण्यात येते. सन 2013-14 या शैक्षणिक  वर्षात 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 408 प्राथमिक शाळेतील 3 हजार 710 मुलींना 22 लाख 26 हजार रुपयाचे  तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 208 माध्यमिक शाळेतील 3 हजार 98 मुलींना 30 लाख 98 हजार अशी एकुण 53 लाख चोवीस हजार रुपये अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींना दिली जाणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची रक्कम मुलींच्या वैयक्तिक बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली  आहे.
     ज्या शाळेतील मुख्याध्यापकांनी आजपावेतो सदरील योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती समाज कल्याण विभाग, उस्मानाबाद यांच्याकडे वर्ग केलेली नाही, त्यांनी त्वरीत माहिती/ यादी   पाठवावी.  या योजनेपासून कुणीही मुली वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर राहील, याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top