उस्मानाबाद :- सन 2013-14 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9 वी  ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅक्ट्रीकपुर्व शिष्यवुत्ती योजना लागू करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्याचे अर्ज ऑनलाईन भरुन त्यांचे कागदपत्र जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे सादर केल्यास त्यास मान्यता देवून शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
       अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जातीचा दाखला जोडणे आवश्यक असल्याचे यापुर्वी कळविले होते. परंतु कांही विद्यार्थ्यांकडे  जातीचा दाखला नसल्याचे दिसून आल्याने ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहून नये, म्हणून त्यांच्या वडिलांचा, सख्या भावांचा किंवा सख्या बहिणीचा जातीचा दाखल असल्यास पाठविण्यात यावेत, ही सवलत फक्त या वर्षासाठीच राहील.
      सदर योजनेसाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसल्याचे कळवून जर पालक नोकरीत असतील तर त्यांनी वार्षिक उत्पन्नाबाबत त्यांनी तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. आणि जर पालक नोकरीत नसतील तर त्यांनी 100 रुपयाच्या हमीपत्रावर वार्षिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
      तसेच नोकरी करीत असलेल्या व अन्य  उत्पन्न असलेल्या पालकांनी मात्र तसे प्रमाणपत्र आणि रु 100 च्या हमीपत्रावर त्यांचे सर्व मार्गानी मिळून असणारे वार्षिक उत्पन्न अशी दोन कागदपत्र जोडणे आवश्यक राहील. 
 
Top