तुळजापूर :- शेतातून घरी परतणा-या एका तरुणीस अज्ञात व्यक्तीने शेतातील ज्वारीच्या पिकात नेऊन तरुणीचे हात-पाय बांधून विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बसवंतवाडी (ता. तुळजापूर) शिवारात घडली. याप्रकरणी रूग्णालयात उपचारादरम्यान तरुणीच्या फिर्यादीवरुन नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली शिवाजी शिंदे (वय 20 वर्षे, रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर) असे रुग्णालयात उपचार घेणा-या युवतीचे नाव आहे. बसवंतवाडी येथील शिवाजी हरिदास शिंदे (वय ५५) हे शेतात गेल्यानंतर त्यांची मुलगी रूपाली शिंदे ही त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन शेताकडे गेली होती. वडिलांना डबा देवून ती परत जात असताना अज्ञात व्यक्तींनी तिला रस्त्यात गाठून ज्वारीच्या पिकात नेले व तेथे दोरीने तिचे हात-पाय बांधले. तसेच तिला विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर युवतीवर सोलापूर येथील रूग्णालयात उपचार चालू असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार घोडके हे करीत आहेत.