उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- सुंदरवाडी (ता. उमरगा) येथील ज्ञान प्रसाकर विद्यालयात आयोजित केलेल्‍या वार्षिक स्‍नेहसंमेलनामध्‍ये एकापेक्षा एक सरस असे नृत्‍य व गीते सादर करुन रसिकांची मने जिंकली.
  सुंदरवाडी येथे वार्षिक स्‍नेहसंमेलनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या
स्‍नेहसंमेलनाचे उदघाटन जि.प. अध्‍यक्ष डॉ. सुभाष व्‍हट्टे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. अध्‍यक्षस्‍थानी माजी पंचायत समिती सभापती गोविंद पाटील हे तर मुरुम नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष प्रदिप दिंडगावे, दिलीप भालेराव, मुरुम पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद निंगदळे, उल्‍हास गुरगुरे, रफिक तांबोळी, पं.स. सदस्‍य रागिनी बिराजदार, चिंचोली (भू) चे तंटामुक्‍त अध्‍यक्ष किशनराव पाटील, सरपंच महादेव गायकवाड, सुंदरवाडी तंटामुक्‍ती समितीचे अध्‍यक्ष मगरध्‍वज चव्‍हाण, मुख्‍याध्‍यापक हणमंत शिंदे, साईबाबा बहुउद्देशीय संस्‍थेचे अध्‍यक्ष संतोष जाधव, सचिव डॉञ एम.जी. मुल्‍ला, केशव सुरवसे, पंडीत सुरवसे, प्रदीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
         तब्‍बल चार ताास चाललेल्‍या स्‍नेह संमेलनाची सुरुवात 'ओमकार स्‍वरुपा' या गिताने करण्‍यात आली. महाराष्‍ट्राची परंपरा जपणारे मराठं मोळं गाणं सादर करीत विद्यार्थ्‍याने रसिकाना ठेका धरायला लावले. सुधीर मुळे याने सादर केलेल्‍या वासुदेव या गीताने महागाईची आठवण रसिकांना करुन दिली. सूरज गाडेकर, सुरज वेळंब, राहुल सोनटक्‍के, लक्ष्‍मण मोरे, गिरीष सगर, हसन मुल्‍ला याने मुक अभिनय सादर करुन मोबाईलचे दुष्‍प‍रिणाम सांगितले. तर नूरजहॉं शेख हिने तुमच्‍या पुढयात कुठ ते मी ज्‍वानीचा मसला, विकीता कदम हिने अप्‍सरा आली ही मराठमोळी लावणी सादर करुन आपल्‍या दिलखेच नृत्‍याने प्रेक्षकांची मने जिंकली. प्राजक्‍ता, करिश्‍मा,विकिता, सलिमा, फरीन यांनी उदे गं अंबे उदे हे गीत सादर केले. याशिवाय आमच्‍या गावची शाळा हे पथनाट्य सादर करनु विद्यार्थ्‍यांनी शिक्षकापेक्षाही हुशार असल्‍याचे ग्रामस्‍थांना पटवून दिले.
          'गड आला पण सिंह गेला' या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. विद्यार्थ्‍यांने आपल्‍या नृत्‍याद्वारे प्रेक्षकांना कधी धनगर वाड्यात, कधी दारुच्‍या गुत्‍यावर घेऊन गेले. देवयानी, जलवा, चांदणं चांदणं, देवा श्री गणेशा, तेरा सराफा, ललाटी भंडार, निंबूडा निंबूडा, पारु गं पारु, वाजले की बारा, सलाम-ए-इश्‍क मेरी जान, जलवा तेरा जलवा आदी गीतावर बाल कलाकारांनी नृत्‍य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधारक जाधव यांनी तर आभार माधव जाधव यांनी मानले. स्‍नेह संमेलनाच्‍या यशस्‍वीतेसाठी मुख्‍याध्‍यापक सुग्रीव मुळे, अभिमन्‍यू गायकवाड, गोविंद राऊत, शरद पवार, किशाेर जाधव, तानाजी राठोड,  बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.
         
 
Top